जनरेटिव्ह AI च्या प्रतिबंधित वापरासंबंधित धोरण
शेवटचे फेरबदल केले: १७ डिसेंबर, २०२४
जनरेटिव्ह AI मॉडेल तुम्हाला एक्सप्लोर करण्यात, शिकण्यात आणि तयार करण्यात मदत करू शकतात. तुम्ही त्यांचा वापर जबाबदारीने, कायदेशीर पद्धतीने आणि सुरक्षितपणे करावा अशी आम्ही अपेक्षा करतो. खालील निर्बंध या धोरणाचा संदर्भ देणाऱ्या Google उत्पादनांमधील आणि सेवांमधील जनरेटिव्ह AI सोबतच्या तुमच्या संवादांवर लागू होतात.
- धोकादायक किंवा बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ नका अथवा अन्यथा लागू कायद्याचे किंवा नियमनांचे उल्लंघन करू नका. यामध्ये असा आशय जनरेट करणे किंवा वितरित करणे याचा समावेश आहे, जो:
- लहान मुलांसोबतचे लैंगिक गैरवर्तन किंवा शोषणाशी संबंधित.
- हिंसक अतिरेक किंवा दहशतवाद सुलभ करते.
- विनासंमती तयार झालेली इंटिमेट इमेजरी सुलभ करते.
- स्वतःला हानी पोहोचवणे सुलभ करते.
- बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी किंवा कायद्याची उल्लंघने सुलभ करते -- उदाहरणार्थ, बेकायदेशीर किंवा नियमन केलेले पदार्थ, वस्तू किंवा सेवा सिथेंसाइझ करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी सूचना पुरवणे.
- गोपनीयता आणि बौद्धिक संपदा अधिकारांच्या समावेशासह इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करते -- उदाहरणार्थ, कायदेशीररीत्या आवश्यक असलेल्या संमतीशिवाय वैयक्तिक डेटा किंवा बायोमेट्रिक वापरणे.
- लोकांच्या संमतीशिवाय त्यांचा माग घेणे किंवा त्यांचे निरीक्षण करणे.
- खूप जास्त जोखीम असलेल्या डोमेनमध्ये मानवी पर्यवेक्षणाशिवाय वैयक्तिक अधिकारांवर भौतिक हानिकारक परिणाम करणारे ऑटोमेटेड निर्णय घेते -- उदाहरणार्थ, रोजगार, आरोग्य सेवा, कायदेशीर, गृहनिर्माण, विमा किंवा समाज कल्याण.
- इतरांची किंवा Google सेवांची सुरक्षितता धोक्यात आणू नका. यामध्ये असा आशय जनरेट करणे किंवा वितरित करणे याचा समावेश आहे, जो पुढील गोष्टी सुलभ करतो:
- स्पॅम, फिशिंग आणि मालवेअर.
- Google च्या किंवा इतरांच्या पायाभूत सुविधा किंवा सेवांचा गैरवापर करणे, त्यांना हानी पोहोचवणे, त्यात अडथळे निर्माण करणे किंवा त्यात व्यत्यय आणणे.
- गैरवापराशी संबंधित संरक्षणे किंवा सुरक्षितता फिल्टरबाबतचे उल्लंघन -- उदाहरणार्थ, आमच्या धोरणांचे उल्लंघन करण्यासाठी मॉडेलमध्ये फेरफार करणे.
- लैंगिकदृष्ट्या भडक, हिंसा, द्वेष किंवा धोकादायक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ नका. यामध्ये असा आशय जनरेट करणे किंवा वितरित करणे याचा समावेश आहे, जो पुढील गोष्टी सुलभ करतो:
- द्वेष किंवा द्वेषयुक्त भाषण.
- छळ, गुंडगिरी, दहशत, गैरवर्तन किंवा इतरांचा अपमान करणे.
- हिंसा किंवा हिंसेला चिथावणी देणे.
- लैंगिकदृष्ट्या भडक आशय -- उदाहरणार्थ, पोर्नोग्राफी किंवा लैंगिक आनंद देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आशय.
- चुकीची माहिती देणाऱ्या, त्यांचा विपर्यास करणाऱ्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होऊ नका. यामध्ये अशा आशयाचा समावेश आहे
- घोटाळे किंवा इतर फसव्या कृती.
- फसवणूक करण्यासाठी, कोणत्याही सुस्पष्ट डिस्क्लोजरशिवाय (जीवित किंवा मृत) व्यक्तीची तोतयेगिरी करणे.
- फसवणूक करण्यासाठी, संवेदनशील विभागांमध्ये कौशल्य अथवा क्षमतेचे दिशाभूल करणारे दावे सुलभ करणे -- उदाहरणार्थ, आरोग्य, आर्थिक, शासकीय सेवा किंवा कायदा.
- फसवणूक करण्यासाठी, सरकारी आणि लोकशाहीसंबंधित प्रक्रियांशी किंवा आरोग्याबाबतच्या हानिकारक पद्धतींशी संबंधित दिशाभूल करणारे दावे सुलभ करणे.
- तो पूर्णपणे मानवाने तयार केला होता असा दावा करून फसवणूक करण्यासाठी, जनरेट केलेल्या आशयाच्या स्रोताबाबत दिशाभूल करणे.
आम्ही शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक आशयाच्या आधारावर अथवा जिथे हानीपेक्षा लोकांना होणारे महत्त्वपूर्ण फायदे जास्त आहेत अशा बाबतीत या धोरणांमध्ये अपवाद करू शकतो.